“मेरी मिट्टी मेरा देश” या अभियाना अंतर्गत जळगाव मनपातर्फे “वीरो को वंदन” या कार्यक्रमाचे आयोजन…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे “मेरी मिट्टी मेरा देश” या अभियाना अंतर्गत जळगाव महानगरपालिकेने विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते.

त्या अनुषंगाने मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली जळगाव मनपा ने दि. १४ ऑगस्ट रोजी “वीरो को वंदन” या कार्यक्रमाचे आयोजन तसेच “सांस्कृतिक कार्यक्रमाचे” आयोजन भैय्यासाहेब गंधे सभागृह जळगाव येथे दुपारी ४:०० वाजता करण्यात आले होते.

यावेळी मा. महापौर जयश्री महाजन व मा.आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, उपमहापौर कुलभूषण पाटील  यांच्या हस्ते स्थानिक नागरी स्वराज्य संस्थेचे कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान केले, अशा संरक्षण दल, निम संरक्षण दल, पोलीस दलातील शहिदांच्या, व स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील सदस्यांचा तसेच आजी-माजी सैनिकांचा, अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कार्यक्रमाच्या वेळी शाल, गुलाब पुष्प, फळ व स्मृतिचिन्ह देऊन पारंपरिक पद्धतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे

महादू तंगु वाणी, उमाकांत सुभाष सोनवणे, केशरबाई शिवराम नेहते, लिलाबाई दत्तात्रय नेमाडे, निलाबाई राजकुमार चोरडिया, लक्ष्मीबाई भगवान कंडारे, शिवाजी सुभाष शिंदे, निर्मलाबाई नामदेव महाजन, कमलाकर नामदेव महाजन, विष्णू भादू खडके, वीरपत्नी फरीदाबी शे. उस्मान, राधाबाई रामदास पाटील, जानकाबाई बाजीराव पाटील, अशोक वामनराव चव्हाण, किरण भास्कर सोनवणे.

जे सदरील कार्यक्रमाप्रसंगी काही कारणास्तव येऊ शकले नाहीत त्यांना सन्मानपूर्वक घरी स्मृतीचिन्ह मनपा प्रशासन तर्फे दिले जाणार आहे

याप्रसंगी अविनाश गांगोडे उपायुक्त, निर्मला गायकवाड उपायुक्त, गणेश चाटे सहा. आयुक्त, अश्विनी गायकवाड सहा.आयुक्त,  अभिजीत बाविस्कर सहा.आयुक्त/मुलेप, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे तसेच प्र.सहा.आयुक्त उदय पाटील (आरोग्य), नगरसचिव  सुनील  गोराणे कार्यालय अधीक्षक अविनाश बाविस्कर  तसेच  प्रभाग समिती क्रमांक 1 ते 4 मधील प्रभाग अधिकारी नरेंद्र चौधरी, प्रकाश सोनवणे, दीपक फुलमोगरे, लक्ष्मण सपकाळे तसेच विभागांचे विभाग प्रमुख, सर्व विभागातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.