गळफास घेत विवाहितेची आत्महत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील शिवाजी नगरातील लाकूडपेठ येथील विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आहे. संगिता उमेश मोघे (वय ४०, रा. लाकुडपेठ, शिवाजी नगर, जळगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी  मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी सकाळी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संगिता उमेश मोघे ह्या विवाहिता पती उमेश भास्कर मोघे यांच्यासह शिवाजी नगरातील लाकूड पेठ येथे दोन मुले व एक मुलगी यांच्यासह वास्तव्याला होत्या. उमेश मोघे हे बळीराम पेठेत खासगी नोकरी करतात. घरात सर्व काही ठिक असतांना संगिता मोघे यांनी सोमवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घरात कुणीही नसतांना राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.

दरम्यान पती उमेश मोघे हे घरी आल्यावर पत्नीने गळफास घेतल्याचे लक्षात आले. शेजारील लोकांच्या मदतीने त्यांना खाली उतरवून तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. राहूल सोनवणे यांनी मृत घोषीत केले. या घटनेबाबत मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी सकाळी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संगीत मोघे यांच्या पश्चात पती उमेश मोघे, मुलगी यशीता, देवांश आणि माहिर हे दोन मुले असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.