आता नाकावाटे मिळणार कोरोना लस !

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कोरोनावर मात करण्यासाठी देशात लसीकरण वेगाने सुरु आहे. लसीच्या पहिल्या दोन डोससह बुस्टर डोसही सध्या देशात दिला जात आहे. अशातच आता बहुप्रतिक्षित नाकावाटे दिली जाणारी लस तयार झाली आहे. या लसीच्या वापरालाही परवानगी देण्यात आली आहे.

भारत बायोटेकला DCGI कडून नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड 19 लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी मिळाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी दिली आहे. नाकावाटे दिली जाणारी ही भारतातली पहिली कोरोना प्रतिबंधक लस असेल.

इतर लसी दंडात दिल्या जातात. यामध्ये औषध स्नायूंमध्ये जाणं गरजेचं असतं. मात्र ही नवी लस स्नायूत देण्याची गरज नाही. नाकामध्ये दोन ते तीन थेंब टाकून ही लस देण्यात येते. नाक चोंदल्यास आपण जो स्प्रे वापरतो, त्याप्रमाणेच ही लस देता येणार आहे. भारत बायोटेकने घेतलेल्या चाचण्यांमध्ये या लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स आढळून आले नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.