पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील पोलीस उपनिरिक्षकास मारहाण झाल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावदा शहरातील बडा आखाडा परिसरात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. याबाबतची माहिती सावदा पोलिसांना कळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली.यावेळी चौघांनी पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी दुपारी साडेचार वाजता घडला.

याबाबत पोलिस कर्मचारी मोहसीन खान शब्बीर खान पठाण यांच्या फिर्यादीनुसार शेख साबीर उर्फ बडा बाबू शेख मंजूर, शेख गुलाब शेख मंजू (दोन्ही रा.बडा आखाडा, सावदा), रीतेश संतोष पाटील, उल्हास कडू पाटील (सावदा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील शेख साबीर उर्फ बडा बाबू शेख मंजूर, उल्हास कडू पाटील यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.