Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    • सोनम वांगचुक यांच्या पत्नीची थेट दिल्ली हायकोर्टात धाव
    • युक्रेनचे रशियावर ड्रोनने हल्ले : ९ ठार, १५० अधिक जखमी
    • सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळणारच ; आरक्षणाशिवाय माघार नाही -मनोज जरांगे पाटील
    ताज्या बातम्या

    मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळणारच ; आरक्षणाशिवाय माघार नाही -मनोज जरांगे पाटील

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 3, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव;-जळगाव जिह्यात साडे तीन लाख शासकीय नोंदी आढळल्या आहेत. मराठा समाजाला ७० वर्षे आरक्षणासाठी प्रतीक्षा करावी लागली. यामुळे या प्रत्येक घरात आरक्षण जाणार आहे. त्यामुळे मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळणारच. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, असे प्रतिपादन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे – पाटील यांनी आज रविवार ३ रोजी चाळीसगाव येथे व्यक्त केला.यावेळी त्यांनी सरकारवरही जोरदार टीकास्त्र सोडले. जरांगे यांच्या खान्देशातील दौऱ्याला आज चाळीसगाव येथून सुरुवात झाली. चाळीसगाव महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजन करण्यात आले होते. शेकडोच्या संख्येने समाज बांधवांची याठिकाणी उपस्थिती होती . .

    मनोज जरांगे पाटील म्हणाले कि मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. समाजाच्या एकजुटीमुळे आरक्षणाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आहे. शासकीय नोंदी सापडू लागल्या आहेत. मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी गेल्या पाच महिन्यापासून लढा सुरू आहे. सर्व मराठा समाजाने एकत्र येऊन एकजूट करून घराघरात हा संदेश द्या. कारण ही शेवटची संधी आहे. या संधीचे सोने करण्यासाठी सर्वांनी पुढे या, असे कळकळीचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी या सभेत केले. माझा जीव गेला तरी चालेल परंतु आरक्षण मिळविल्याशिवाय एक इंच ही मागे हटणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी या सभेत मांडली .

    #chalisgaon Manoj Jarange Patil Maratha Samaj
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ढगांच्या ‌‘ऑफलाइन‌’ मोडमुळे शेतात सायलेंट मोड!

    July 14, 2026

    जळगावात भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान शिबीर

    July 14, 2026

    11 पुनर्वसित गावांच्या मालमत्ता नोंदींचा प्रश्न मार्गी!

    July 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif