रिजर्व बँक अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची अनोखी संधी मिळणार-संगीता पाटील

0

जळगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरला सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जळगावकडून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई द्वारे आयोजित राष्ट्रव्यापी MSME सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळाले आहे. हा विशेष कार्यक्रम येत्या 4 डिसेंबर 2023, सोमवार रोजी एच-10 आर. जे. फूड्स (पार्ले-G) येथे KIA शोरूमच्या मागे, पुष्पा पेट्रोल पंपाच्या बाजूला, MIDC जळगाव येथे सकाळी 10:30 वाजता होणार आहे. ही माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला समितीच्या चेअरपर्सन संगीता पाटील यांनी दिली.

औपचारिक क्रेडिट लिंकेजची सद्यस्थिती आणि MSMEs कडून वित्तपुरवठ्यात येणाऱ्या आव्हानांची सर्वसमावेशक माहिती देणे, या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे, रिजर्व बँक मुंबईचे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ते समस्या सोडविण्यासाठी आणि प्रभावी उपाययोजना करण्यासाठी विशेष मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजन जळगांव एलडीएम प्रणव कुमार झा व अरुण प्रकाश यांच्या वतीने करण्यात करण्यात आले आहे. कार्यक्रमाला जळगांव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह जिल्हा परिषद सिईओ, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, बँकेचे समन्व्यक, नाबार्ड व जिल्हा उद्योग केंद्राचे तसेच इतर अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

हा विशेष कार्यक्रम म्हणजे MSME ना एक सुवर्णसंधी असून सर्व सदस्यांना रोजगार निर्मिती, निर्यात आणि जळगाव जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण वाढीसाठी आवश्यक माहिती, सूचना मिळणार आहे. त्यासह काही अडचणी असल्यास संबधितांच्या समोर मांडू शकतात. जळगांव विभागातील MSME ना भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ठोस धोरण निर्माण करण्यात हा कार्यक्रम महत्वाचा ठरणार आहे. रिजर्व बँक अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची अनोखी संधी मिळणार असून आपल्या पायाभूत अडचणींसह अन्य समस्यां त्यांच्यासमोर मांडता येणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र चेंबरचे गव्हर्निंग कौन्सिल मेंबर संगीता पाटील, महेंद्र रायसोनी, किरण बच्छाव, नितीन इंगळे, दिलीप गांधी, पुरुषोत्तम तावरी, संजय दादलिका यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.