ब्रेकिंग ! मुख्यमंत्र्यांनी जरांगेंचे उपोषण सोडवले

सर्व मागण्या मान्य, सरकारने अध्यादेशही काढला

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील यांना मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला. या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे.

मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही वाशीत सभास्थळी आले. यावेळी मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला माळा अर्पण केली. त्यानंतर मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन आपले उपोषण सोडले. तसेच शिंदेंच्या हस्ते जीआर स्विकारला. दरम्यान, राज्य सरकारने जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. राज्य सरकारकडून तसा अध्यादेश सुपूर्द करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजाला यश मोठं यश मिळालं आहे. तसेच वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक मोठी विजयी सभा देखील मनोज जरांगे पाटलांची होणार आहे. या सभेची जोरदार तयारी सध्या सुरु आहे.

https://x.com/ANI/status/1751013602918887886?s=20

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आमचा विरोध आता संपला आहे. आमच्या मागण्या मान्य करण्यात आली आहे, असं मनोज जरांगे यांनी सांगितले. मध्यरात्री पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी ही घोषणा केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याची माहिती देखील मनोज जरांगे यांनी यावेळी दिली. यावेळी मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित होते.

मराठा आरक्षण आंदोलनाबाबत महाराष्ट्राचे मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी मनोज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावर आज तोडगा निघाला आहे. सरकारने तोडगा काढल्याने आंदोलन सुरू ठेवण्याची गरज नाही, असे मनोज जरांगे यांनी जाहीर केले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांचे उपोषण ज्यूस पिऊन संपवतील, अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.