अभिनेत्री जयाप्रदा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी ; अटकेसाठी पोलीस रवाना

0

रामपूर ;-अभिनेत्री जयाप्रदा यांनी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असताना त्यांनी एका रस्त्याच उद्घाटनकेल्याने त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोपाप्रकरणी त्यांच्याविरोधात स्वार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलझाला असून दुसर्या प्रकरणात आचारसंहितेच्या काळात त्यांनी पिपलिया मिश्र गावात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता . कोर्टाने जयाप्रदा यांच्याविरोधाच अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. कोर्टाने पोलिसांना जयाप्रदा यांना अटक करुन कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित प्रकरण हे लोकसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं आहे. विशेष न्यायाधीश एमपी-एमएल मॅजिस्ट्रेट कोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडली होती. या प्रकरणाच्या सुनावणीत जयाप्रदा या सातत्याने दिलेल्या तारखेला कोर्टात हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे कोर्टाने जयाप्रदा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.

अशाप्रकारचं वॉरंट याआधीदेखील जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पण तरीही जयाप्रदा सुनावणीच्यावेळी कोर्टात हजर राहिल्या नाहीत. या प्रकरणावर एडीजीसी संदीप सक्सेना यांनी सांगितलं की, जयाप्रदा वारंवार दिलेल्या तारखेवर कोर्टात हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात पुन्हा अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 12 फेब्रुवारीला होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.