पोटदुखीकडे दुर्लक्ष करणे ठरेल घातक ; तरुणांमध्ये वाढतोय कोलन कॅन्सरचा धोका

0

मुंबईः – वारंवार पोटदुखीचा त्रास, ऍसिडीटी, अपचन यामुळे होत असेल. तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. यामुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. असे कोणी सांगितल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हे खरे आहे . कारण सध्या जगभरात कॅन्सरची प्रकरणे झपाट्याने पसरत आहेत. त्यात आता कोलन कॅन्सरच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. काही माणसं पोटदुखी कितीही असली तरी त्याकडे दुर्लक्ष करतात, मात्र पोटदुखीकडे दुर्लक्ष करणे हे कधी कधी अंगलट येऊ शकते. आणि पोटामधील समस्या दीर्घकाळ राहिली तर त्याचा परिणाम कॅन्सरसारखा रोग होऊ शकतो.

मेडिकलच्या भाषेत याला कोलन कॅन्सर असे संबोधले जाते. हा कर्करोग मोठ्या आतड्यात (कोलन) किंवा गुदाशयात होतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे कोलन कॅन्सरच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असते. कोलन कॅन्सर हा बरा होऊ शकतो मात्र वेळेवर निदान न केल्यामुळे, हा कर्करोग जगभरात लाखो लोकांचा बळी घेतो.

कोलन कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला विविध प्रकारची फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य खावे लागतील. त्याचबरोबर दारू पिणे कमी करावे लागेल आणि धूम्रपान बंद करावे लागेल. याशिवाय तुम्हाला नियमित व्यायाम आणि निरोगी वजन राखावे लागेल. जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्ससाठी फळे, भाज्या खाणे आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.