मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता !

CM शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठा आरक्षणासाठी मराठा समाज खूप आक्रमक झाला आहे, तर काही भागांमध्ये शांततेत आंदोलन सुरू आहे. दरम्यान आज यासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण उपसमितीची महत्वाची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत आरक्षणाबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

बैठकीमध्ये आज मोठा घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचसोबत या बैठकीनंतर मुख्यमंत्री मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी रवाना होणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यांवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषणाला बसले आहे. त्याच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून त्यांची प्रकृती बिघडत चालली आहे.

तर सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू आहे. कुणबी नोंदणी आढळणाऱ्यांना आरक्षण देण्यात येण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनाच आरक्षण दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.