परभणी विभातील बसफेऱ्या आजही बंद

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, या आंदोलनाचे तीव्र पडसाद राज्यात उमटत दरम्यान आंदोलनाला हिंसक वळण आल्याने अनेक ठिकाणी बसची जाळपोळ व दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परभणी जिल्ह्यातील बससेवा सलग दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात आली आहे.

राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असल्याने तीव्र पडसाद उमटत आहेत. याच पार्वभुमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांची तोडफोड होऊ नये आणि नुकसान होऊ नये, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागातील सातवी आगारातील वाहतूक कालपासून बंद करण्यात आली आहे. आजही वाहतूक बंद असल्याने प्रवाशांना सकाळपासून गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागामध्ये (St Bus) परभणी आणि हिंगोली असे दोन जिल्हे येत असल्याने या दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना आता प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. जोपर्यंत पोलीस अधीक्षकांकडून वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना मिळत नाहीत, तोपर्यंत वाहतूक सुरळीत होणार नसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.