नाशिक येथे मोबाईलचा स्फोट होवून तरुणाचा मृत्यू, वाचा सविस्तर

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

मोबाईलचा वापर झाला की आपण चार्जिंगला लावून झोपतो. पण कधी कधी हीच सवय आपल्या अंगलट येऊ शकते. नाशिकमधील एका तरुणाला मोबाइलला चार्जिंगला लावून झोपणं चांगलेच महागात पडले आहे. नाशिकमध्ये मोबाईलचा स्फोट होऊन गंभीररीत्या भाजल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रात्री मोबाईल चार्जिंगला लावून हा तरुण झोपला होता. मात्र या मोबाईलचा स्फोट झाल्याने तो गंभीररीत्या भाजला गेला, पण उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

नाशिकच्या मनमाडजवळील कऱ्ही गावात ही भयानक घटना घडली आहे. रोहित राख असे मृत तरुणाचे नाव आहे. रोहित नांदगाव येथे शिकण्यासाठी होता. रात्री अभ्यास करून रोहित घरात मोबाईल चार्जिंगला चावून तेथेच झोपला. त्यानंतर मोबाईलचा जोरदार स्फोट झाल्याने आग लागली. मोबाईलचा स्फोट इतका भीषण होता की, लागलेल्या आगीत रोहित ८०% भाजला हेल होता. गंभीर अवस्थेत त्याच्यावर मनमाड व मालेगाव येथे उपचार करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान रोहितचा मृत्यू झाला. रोहितच्या अशा जाण्याने परिवारावर शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.