जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क:
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. माजी मंत्री राजेश टोपे यांच्या पाथरवाला बु गावात आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका तरुणाने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी मुलाचा जीव वाचवण्यासाठी आईने कसलीही तमा न बाळगता धडपड करणारी त्या मुलाची आई या घटनेत गंभीर भाजली आहे. दरम्यान दोन्ही जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
सूरज आज घरी असताना मराठा आरक्षणावर चर्चा केल्यानंतर ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून आग लावून घेतली ही बाब लक्षात येताच त्याच्या आईने त्यांच्याकडे धाव घेऊन आग विझवण्याचा पर्यंत केला. या घटनेत आई आणि मुलगा हे दोघेही साठ टक्के भाजले. त्यांना गावाकऱ्यांनी उपचारसाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. सूरज गणेश जाधव या सतरा वर्षीय युवक गेल्या तीन महिन्यापासून मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय आहे. सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसल्याने आपण हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याने सांगितले.