शाळकरी मुलांच्या ऑटोची भरधाव ट्रकला धडक… (व्हिडीओ)

0

 

विशाखापट्टणम, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक ऑटो एका ट्रकला कसा धडकतोय, हे दिसत आहे. आणि या धडकेत ऑटोमध्ये बसलेली शाळकरी मुले कित्येक फूट हवेत फेकले गेले. घटनास्थळाजवळ बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ट्रक आणि ऑटो यांच्यात झालेल्या धडकेचा व्हिडिओ कैद झाला आहे.

35 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे

सकाळी सातच्या सुमारास मुले शाळेत जात असताना हा अपघात झाला. 35 सेकंदाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संगम शरत थिएटर जंक्शनवर हलकी वाहतूक दिसत आहे. दरम्यान, उड्डाणपुलाच्या खालून एक ट्रक सिग्नल ओलांडत आहे. दरम्यान, भरधाव वेगात आलेल्या ऑटोने ट्रकला धडक दिली. ट्रक आणि ऑटोची धडक इतकी जोरदार होती की ऑटोमध्ये बसलेली मुले अक्षरशः अनेक फूट बाहेर फेकले गेले.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आठ शाळकरी मुलांपैकी चार मुलांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे, तर इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. यातील एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या आम्ही संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहोत. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासोबतच काही प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.