मनपातील १२ अभियंत्यांच्या बदल्या कायम

0

जळगाव : महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांनी मनपातील १२ अभियंत्यांच्या बदल्या दि.१० रोजी केल्या असून सदर अभियंत्यांच्या आदेशात बदल करावयाचे असल्यामुळे तो आदेश स्थगित करण्यात आला होता.

मात्र, शुक्रवारी आयुक्तांनी दि.१० रोजीचा आदेश कुठलाही बदल न करता कायम केला आहे. आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांनी नगररचना विभागातील अभियंत्यांची बांधकाम विभागात व बांधकाम विभागातील अभियंत्यांची बदली नगररचना विभागात केली होती. यात बांधकाम विभागातील मनोज वडनेरे, विजय मराठे, आर. टी. पाटील, योगेश वाणी, जयंत शिरसाठ यांची बदली नगर रचना विभागात तर, समिर बोरोले, प्रसाद पुराणिक यांची बदली बांधकाम विभागात केली आहे. तसेच अतुल पाटील, प्रकाश पाटील, नरेंद्र जावळे, जितेंद्र रंधे यांच्या पदभार बदलण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.