फडणवीस मोदींचा करेक्ट कार्यक्रम करतील – जरांगे

0

बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी भाषेत टीका केलीय.

आज बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी टीका केली आहे.  आगामी लोकसभा निवडणुकीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मराठा द्वेषामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करेक्ट कार्यक्रम होईल, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या लेखी मी मराठा समाज आणि सत्ता याच्यातील काटा आहे. हा काटा काढावाच लागणार. मी देखील तुरुंगात सडायला तयार आहे.

त्यांच्या पोटात.. 

बीडच्या गेवराई तालुक्यात रविवारी ‘मोफत नोकरी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मनोज जरांगे उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. यावरुन फडणवीसांच्या मनात असलेला मराठ्यांविषयीचा द्वेष दिसून येतो. गोरगरीब मराठ्यांचे काम त्यांना पुढे जाऊन द्यायचे नाही. त्यांच्या पोटात मराठ्यांविषयी किती राग आहे, हेच दिसून येते. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एसआयटी चौकशी लावण्यात आली आहे. एसआयटीच्या पथकाकडून माझ्या डॉक्टरांची चौकशी केली जात आहे. माझ्यावर जेसीबीतून फुले उधळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी चूक आहे.

मोदींचा करेक्ट कार्यक्रम ?

देवेंद्र फडणवीस यांचे सध्याचे वर्तन म्हणजे ग्रामीण भागातील ‘बुडतीचे पाय डोहाकडे’ या म्हणीप्रमाणे आहे. फडणवीस मोदी साहेबांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहेत. माझ्यावर फुलं टाकणाऱ्या लोकांवर गुन्हे का दाखल केले जात आहेत? राज्य सरकार माझ्यावर इतकं का जळतं? देवेंद्र फडणवीस तुमच्या जळण्याने काही होणार नाही. हे वर्तन गृहमंत्र्यांना शोभत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आता माझ्यावर सूड उगवायचे ठरवले आहे. मी म्हणजे त्यांना सत्ता आणि मराठा समाज यांच्यात असलेला काटा वाटत आहे. हा काटा काढावा लागणार, हा देवेंद्र फडणवीसांचा पण आहे. पण मीदेखील तुरुंगात सडायला तयार आहे. गोरगरीब मराठा समाज एकदा पण केला की तो पूर्णच करतो. तुम्हाला तुमचा पण पूर्ण करायचा आहे, आम्ही देखील आमचा पण पूर्ण करू, असा इशाराही यावेळी जरांगे पाटील यांनी फडणवीसांना दिला.

जरांगेंवर 5 गुन्हे दाखल

राज्यभर फिरून सत्कार स्वीकारणाऱ्या आणि गर्दी जमवणाऱ्या मनोज जरांगे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल करायला सुरुवात केली होती. काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्यासह इतर 12 जणांवर बीडमध्ये विना परवाना रॅली काढून जेसीबीने फुल उधळल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज जरांगे यांच्यावर दाखल करण्यात आलेला हा पाचवा गुन्हा दाखल ठरला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.