बुजगावणे गोफणीची जागा आता भोंग्यानं घेतली

0

लोहारा ता. पाचोरा (हर्षल राजपूत), लोकशाही न्यूज नेटवर्क 

जस-जस तंत्रज्ञान विकसित होत आहे. तसंच मानवी जीवन उंचावत आहे.. या तंत्रज्ञानाचा वापर शेतकरीवर्ग सुद्धा करू लागला असून कालानुरूप होणारी शेती आता तंत्रज्ञानानुसार प्रगत होऊ लागली आहे. निसर्ग नियमानुसार अन्नाची साखळी विधात्याने लावली आहे. यातूनच दाने-दाने पर लिखा है खानेवाले का नाम ! अशी उक्ती उदयास आली आहे. या साखळीत शाकाहारी व मांसाहारी असे सजीव या सृष्टीवर आहेत.

या सृष्टीत जन्माला आलेला मानव हा अधिक चतुर समजला जातो. तो शेतीही आपली माऊली संबोधतो. हा जगाचा पोशिंदा शेतकरी खरीप- रब्बी ही दोन सत्रातली पिकं घेतो ऐन तोंडी आलेला घास कधी नैसर्गिक आपत्ती किंवा या पिकांवर ज्यांची गुजरान होते. अशी वन्य जीव नुकसानीची संक्रांत आणतात यापासून वाचण्यासाठी अनेकवेळा शेतकऱ्यांचे प्रयत्न अपुरे पडतात.

खरीप हंगाम निसर्गावर अवलंबून असलेली सर्वच शेती शेतकऱ्यांकडून पिकवण्यासाठी सज्ज झालेली असते. म्हणजेच शाकाहारी वन्यजीवांना या कालावधीत खाद्य आलबेल उपलब्धता होते. जसजसे दिवस जातात पिकवणीला आलेले पिक उत्पन्न शेतकरी काढून घेतो. तदनंतर या वन्यजीवांना खाद्याचे दुर्भिक्ष जाणवायला लागते सोयीने मिळेल त्या ठिकाणी हे वन्यजीव ताव मारतात व शेतकऱ्याच्या मेहनत व उत्पन्नाची वाट लागते.

खरीप पिकामध्ये शक्यतो गहू, ज्वारी, बाजरी, दादर, हरभरा या पिकांचा समावेश असतो. भरघोस उत्पन्नासाठी शेतकरी अधिक मेहनत घेतो. काही कालावधीनंतर ही पिक परिपक्व दशेत येतात म्हणून पिकांचे संरक्षण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. पशु पक्षांकडून ज्वारी, बाजरी, दादर यांचे कणीस व हरभऱ्याचे घाटे चोसले जाऊ नये म्हणून तंत्रज्ञानाअभावी शेतकऱ्यांना आपल्या शेतात पाडाव टाकून शेत क्षेत्राच्या मधोमध माचला उभा करावा लागत असे. या माचल्यावर उभे राहून गोफणीच्या सहाय्याने दगडांचा लांबपर्यंत वर्षाव करावा लागत असे. यातही राखणदाराची किंवा शेतकऱ्याची मेहनतीवर काही अंशी तरी धान्य इवल्याशा चोचीने खाऊन गंडांतर पशुपक्षी आणत असत. यामुळे आता शेतकरीवर्ग प्रगत तंत्रज्ञानाचा सहारा घेऊ लागला आहे.

या गोफणीची जागा आता भोंग्याने घेतली असून या कर्णकर्कश आवाजाने शेतात शेतकरी आपल्याला हुसकवण्यासाठी हुर्याहू— हुर्याहू— करीत आहे. असा आवाज असलेला भोंगा सुरू ठेवतोय यामुळे पशुपक्षी वरच्यावर किंवा आजूबाजूला धिरट्या मारून पळ काढतात परिणामी पशु-पक्षांकडून पिकांवर होणारे आक्रमण अजिबात नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे यांकडून होणारे नुकसान होत नसल्याने शेतकरी वर्ग बिनधास्त झाला आहे.

या भोंग्याची खासियत अशी आहे. की याला निसर्गाच्या मंद सानिध्यात कर्णकर्कश आवाज येतो याची डबल बॅटरी सिंगल बॅटरी प्रमाणे मार्केटमध्ये उपलब्ध होतो. सरासरी याची किंमत 650 रुपये, अशी असून फोन चार्जिंग प्रमाणे चार्जिंगची सुविधा यात दिलेली. सात तास चार्जिंग करा व बारा तास त्याची बोंबलण्याची क्षमता आहे. स्वतःचा आवाज आपण रेकॉर्डिंग करू शकतो व पाहिजे त्या वेळेवर सेट करू शकतात.

या भोंग्याचा वापर शेतकरी वर्ग रात्री आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतात जातो. त्यावेळेस हा भोंगा चालू ठेवून हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी वापर करतात तर दिवसा पक्षांपासून होणारे नुकसान टळावे म्हणून काठीवर टांगून बुजगावणं म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकरी करू लागले आहेत.  म्हणजेच शेतकऱ्यांना गोफणीचा वापर करून परिश्रम करावे लागत असत ती जागा आता फायदेशीर भोंग्यान घेतली असून ओरडून-ओरडून घशाला पडणारी कोरडही थांबली.

Leave A Reply

Your email address will not be published.