मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी अनेक सुविधा असलेली व्हॅनिटी व्हॅन

आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघणार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघणार आहे. यादरम्यान जरांगे पाटलांचे सहा ठिकाणी मुक्काम आहेत. यादरम्यान जरांगे पाटलांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बीड मधील मराठा समन्वयकांनी जरांगेंसाठी व्हॅनिटी व्हॅन आणली आहे. अत्याधुनिक अशी सुविधा असलेली ही व्हॅन ज्यामध्ये एसी पासून ते वॉशरूम, बाथरूम, छोटा फ्रिज, मायक्रोवेव्हसह, टीव्ही देखील असणार आहेत.

जरांगे पाटील मराठा बांधवांसह उद्या 20 जानेवारीला अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत शेवटचा तोडगा न निघाल्याने मनोज जरांगे पाटील मुंबईत पायी येण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. मनोज जरांगे पाटील मुंबईला येण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे मुंबईत अडचण होईल, मिनिटांवर चालणारी मुंबई यामुळे थांबू शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रोटोकॉल सोडून त्यांच्या आंदोलनाजवळ गेले. अनेक मंत्री देखील गेले. मात्र, मागण्या पूर्ण न झाल्यामुळे ते मुंबईत दाखल होणार आहेत.

मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जडांगे पाटील यांनी राज्य सरकारला 20 जानेवारीपर्यंतची मुदत दिली असून, काल सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिष्टमंडळात सोबतची चर्चा फिस्कटली असून मनोज जरांगे पाटील 20 जानेवारीला मुंबईत जाण्यासाठी ठाम आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.