नदीपात्रात बुडालेल्यांच्या वारसांना ५ लाखांचा आ.चिमणराव पाटील यांच्याहस्ते धनादेश

0

पारोळा;- जळगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र रामेश्वर येथील नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या तिन जणांच्या वारसांना आ.चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नातून प्रत्येकी ५ लाख रूपयांची मदत देण्यात आली. यावेळी वारसांना आ.पाटील यांच्याहस्ते धनादेश सुपूर्त करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र रामेश्वर येथे कावड यात्रेतसहभागी झालेले अक्षय प्रविण शिंपी, सागर अनिल शिंपी व पियुष रविंद्र शिंपी यांचा बुडून मृत्यू झाला होता. आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नातून प्रत्येकी ५लाखांची मंजूरी देण्यात आली. त्यानुसार नुकतेच आ. चिमणराव पाटील यांच्याहस्ते प्रत्येकी ५ लक्ष रूपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आले. तसेच एरंडोल तालुक्यातील शेतकरी बांधवांचा पशुधनाचा झालेल्या नुकसानीचे प्रत्येकी ३२ हजार व शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबियांचा वारसांना देखील प्रत्येकी १ लक्ष रूपयांचे अर्थसहाय्य धनादेश देण्यात आले.

याप्रसंगी जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील, धरणगाव बाजार समिती सभापती शालिक गायकवाड, तालुकाप्रमुख रवि जाधव, शहरप्रमुख आनंदा चौधरी, मा.नगराध्यक्ष विठ्ठल आंधळे, किशोर निंबाळकर, माजी नगरसेवक चिंतामण पाटील, जावेद मुजावर, म्हसवे मा.उपसरपंच साहेबराव पाटील, ताडे येथील सचिन पाटील, शहरसंघटक मयुर महाजन, नागदुली येथील जगदीश पाटील यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.