पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भावुक होऊन मानले जनतेचे आभार!

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच (Prime Minister Narendra Modi) ‘मन कि बात’ (Mann Ki Baat) प्रत्येक जण ऐकत असतात. त्यांच्या ह्या कार्यक्रमाचा १०० वा एपिसोड नुकताच पार पडला, आणि त्यात ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. कार्यक्रम सर्वत्र प्रसारित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मोदी म्हणाले कि मन कि बातमुळे मी सामान्य जनतेशी जुळून असतो. त्याचप्रमाणे त्यांनी सर्वांचेच कौतुक सुद्धा केल .

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्या कार्यक्रमाच्या १०० व्या एपिसोडची चांगलीच जय्यत तयारी करण्यात आली होती. तसेच हा कार्यक्रम देशातच नव्हे तर परदेशातही हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. हा कार्यक्रम लंडन ते UN च्या मुख्यालयात प्रसारित केला जात आहे. भाजपनं (BJP) याला ‘मेगा इव्हेंट’ बनवले आहे.

बोलतांना भावुक झाले मोदी
मन की बात हा कार्यक्रम एका माळेतील मोती प्रमाणे आहे. यातील प्रत्येक मोती एकमेकांना जोडून ठेवण्याचे काम करतो. आज मन की बातचा १०० वा भाग आहे. मला तुम्हा सर्वांचे लाखो संदेश आले आहेत. मी शक्य तितके संदेश समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हा सर्वाचे हे संदेश वाचून मी अनेकवेळा भावूक झालो.मन की बातच्या या १०० व्या भागासाठी तुम्ही माझे अभिनंदनही केले आहे, पण खरे तर तुम्ही श्रोते यासाठी अभिनंदनास पात्र आहात. तुम्हा सर्व देशबांधवांचे मी आभार मानतो.

Leave A Reply

Your email address will not be published.