लोहाराहून जळगावकडे जाणाऱ्या बसला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद, सोयगाव आगार वगळता इतरांची निद्रिस्तता

पदाधिकारी; लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा आला समोर

0

लोहारा, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

कोरोना कालावधी सुरू झाला व संपलाही तेव्हापासून लोहारा ते जळगाव जाण्यासाठी कोणत्याही आगाराची रा.प.म.बस या मार्गावर नव्हती यामुळे सवलत धारक व सुज्ञप्रवास यांना खाजगी वाहनाने प्रवास करून एक प्रकारे तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत होता, पण अवघ्या काही दहा ते पंधरा दिवसांपासून सोयगाव (Soygaon) आगाराने सोयगाव-लोहारा-जळगाव अशा दोन बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. सरकारने महिलांना प्रवासी टिकतात अर्धी सवलत जाहीर करून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. खाजगी वाहनाने प्रवास करण्यापेक्षा आपल्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी महिला प्रवासी येणाऱ्या बसेसची आतुरतेने वाट पाहतात म्हणजेच बस सेवेला प्रतिसाद मिळालेला दिसून येतो. सोबतच कुटुंबातील काही सदस्य राहत असल्याने बसेसना गर्दी होत आहेत.

सोयगाव-लोहारा- जळगाव जाण्यासाठी ही बस सकाळी ७:४५ व ८:४५ लोहाराहून या वेळेत आहेत मात्र त्यानंतर नाहीत कुतूहालाचा विषय असा आहे की लोहारा गाव पाचोरा तालुक्यात असताना तालुक्याच्या ठिकाणाहून सुद्धा या मार्गावर बसफेरी सुरू व्हावी यासाठी लोहारा येथील पदाधिकारी लोकप्रतिनिधी प्रयत्नशील नाहीत तर जिल्ह्याचा विषय सोडाच सामान्य जनतेचा हिताचा विषय असला तर चुप्पी धारण करायची अन कोणती शासकीय योजना लाटण्यासाठी पुढे यायचे अशी वृत्ती लोहारा येथील पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांनी अंगीकारली काय? हा दाहक, झणझणीत प्रश्न निर्माण होतोय. या बसना मिळणारा प्रतिसाद पाहता या दोन बसेस गेल्यानंतर पुढच्या वेळात कोणत्याही आगाराने बस सुरू केलेली नाही. म्हणजेच इतर आगारांची निद्रिस्तता दिसून येते आहे. खाजगी प्रवासी वाहतुकीकडून प्रवासी वर्ग बस सेवेकडे वळला असल्याने वैतागलेल्या प्रवासी वर्गातून अन्य आगारांनी या मार्गावर नंतरच्या वेळेत व अजून काही आवश्यक मार्गांवर बस सेवा सुरू करावी अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.