मनवेल येथे हायमास्ट पथदिवे बनले शो-पीस

0

लोकशाही न्युज नेटवर्क

 

मनवेल (Manavel) ता.यावल आमदार/खासदार यांच्या नीधीतुन मनवेल येथे आठ वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून लावलेले पथदिवे शोभेची वस्तू ठरत आहे. त्यामुळे गावात अंधाराचे साम्राज्य असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील चौका चौकात ग्रामस्थांच्या सोयीसाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून हायमास्ट लावण्यात आले असून, स्थानिक विकास निधीअंतर्गत आठ, असे एकूण आठ हायमास्ट गावात जागोजागी लावण्यात आले होते. परंतु, संबंधितांकडून पथदिव्यांची देखरेख नसल्याने गेल्या काही वर्षांपासून पथदिवे शोभेची वस्तू बनली आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचे चित्र आहे. पथदिव्यांची दुरुस्ती करून सुरू करण्याची मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.