धरणगाव रस्त्यावर भीषण अपघात, तरुण जागीच ठार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

सध्या शहरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. धरणगाव रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना आज २६ रोजी घडली आहे. धरणगाव तालुक्यातील पिंपरी जवळ मुख्य रस्त्यावर दुचाकीस्वार आयशर क्र. एम. एच. १८. बी. झेड. ०६२२ याने जोरदार धडक दिल्याने तरुणाचा रस्त्यावरच जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उद्धव ढमाडे यांच्यासह खुशाल पाटील, दीपक पाटील, समाधान भागवत यांच्यासह कर्मचारीसह भेट देत आयशर पोलीस स्थानकात जमा केली होती. या तरुणाचा मृतदेह धरणगाव रूग्णालयात आणण्यात आल्याचे समजते. हा तरुण धरणगाव तालुक्यातील वाघळूद गावातील गजानन पाटील(४३) असल्याचे देखील समजते. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.