दुचाकी चोरून बनावट कागदपत्रे बनवून विक्री; टोळीचा पर्दाफाश

0

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहर पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपुत यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून डीबी पथकाचे सपोनी सुखदेव भोरकडे यांना माहिती देऊन शहरातील चौकाचौकात वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. वाहन तपासणी दरम्यान शहरातील मोहनपुरा भागातील सोहेल परवेज काजी अनिसोद्दीन याचेकडे असलेल्या गाडीचे कागदपत्र व गाडीवरील चेचिस नंबरची खात्री केली असता ते बनावट असल्याचे समजल्यावर मोटारसायकल पो.स्टे.ला आणुन फिर्याद दिल्यावरुन अप नं 456/22 कलम 420,465,468,471,120 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्यात मोटारसायकल विक्रीची मध्यस्थी करणारा मो. जावेद शेख अय्युब व त्याचा मित्र शोयबखान बिस्मिल्लाखान दोन्ही रा. अहमदशाहपुरा. पारपेठ मलकापुर हे निष्पन्न झाल्याने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व सदरच्या मोटारसायकली बुलढाणा शहर व इतर ठिकाणांहून चोरुन बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करीत असल्याचे सांगितले वरून सै. समीर सै.युसुफ, सै.शकील सै. युसुफ (डॉन ) व खडकी ता. मोताळा येथील आकाश हरी राठोड हे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यासाठी बुलढाणा शहर पोलिसांची मदत घेऊन सै शकील उर्फ डाॅन आणि आकाश राठोड यांना रात्री ताब्यात घेतले आहे असे एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडी घेऊन त्यांच्या ताब्यातुन एकुण सहा गाड्या किंमत पावणेचार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नमूद आरोपीतांनी कबुलीमध्ये बनावट दस्तऐवज, आरसी बुक, आधार कार्ड, स्टॅम्प पेपर इत्यादी तयार करणारे मास्टर माईंड सै समीर सै युसुफ व त्याचा भाऊ सै.शकील सै. युसुफ (डॉन) हे असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे दोघे भाऊ व आकाश राठोड हे सर्व सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुद्ध मोटर सायकल चोरी, घरफोडी व इतर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये मोठे रॅकेट असून मुख्य आरोपी सै समीर सै युसुफ यास लवकरच ताब्यात घेऊन गुन्ह्याची अधिक उकल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

सदरची कार्यवाही जि.पो.अधिक्षक सारंग आव्हाड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त खामगाव, अभिनव त्यागी उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पो.स्टेचे पोलीस निरीक्षक  विजयसिंह राजपूत व सपोनी सुखदेव भोरकडे  तसेच पोहेकाॅ भगवान मुंढे, पोकाॅ गोपाल तारुळकर, ईश्वर वाघ, सलीम बर्डे, प्रमोद राठोड यांनी केली आहे.

यानिमित्ताने पो.नि राजपूत यांनी जनतेला आव्हान केले आहे की, आपण खरेदी केलेल्या गाड्यांची कागदपत्राची खात्री करावी. वाहनाचे कागदपत्र व गाडीवरील चेचिस नंबर पडताळून पाहावा चुकीचा असल्यास पोलीस स्टेशनला तक्रार करावी असे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.