वर्ल्ड रेकॉर्डमधे सहभागी होण्यासाठी कलाकारांना संधी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

येत्या १७ डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरातून कित्येक हजार कलाकार एकच वेळी “आयिगिरी नंदिनी” या महिषासुर मर्दिनी स्त्रोत्रवर ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर नृत्य प्रदर्शन करणार आहेत. यावेळी एक नाही दोन नाही तर तब्बल १० वर्ल्ड रेकॉर्ड साधण्याचा प्रयत्न हे सर्व कलाकार करणार आहेत. यात उपक्रमात वय वर्ष ६ वरील कोणीही सहभागी होऊ शकते.

नृत्याची आवड असणाऱ्या सर्वांसाठी हा उपक्रम खुला असून, यात सहभागी होण्यासाठी नृत्य येणे आवश्यकच आहे असे नाही. तर उपक्रमापूर्वी सात दिवसीय एक कार्यशाळा ऑनलाईन वा ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार असून, या कार्यशाळेत नृत्य सद्धा शिकविले जाणार आहे. ऑनलाइन कार्यशाळेमुळे बाहेर गावच्या सुध्दा हौशी कलाकारांना यात सहभागी होता येणार आहे.

जागतिक स्तरावर राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख १४ नोव्हेंबर असून जास्तीत जास्त हौशी कलाकारांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन गंधर्वि कथक नृत्यालयाच्या संचालिका व या उपक्रमाच्या विभागीय समन्वयिका जास्मिन गाजरे-राणे यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता http://gandharvi.co.in या वेबसाईट वर भेट द्यावी किंवा ७५८८५७९९२८ यावर संपर्क साधावा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.