फैले प्रेम परस्पर जग में, मोह दूर पर रहा करें

0

प्रवचन सारांश –  08. 11. 2022

‘मेरी भावना’  ही रचना फक्त वाचण्यासाठी नव्हे तर प्रत्यक्ष जीवनात  अवलंबण्यासाठी आहे. पुढील काळामध्ये अशा रचनेची आठवण आपल्या मनात कायम ठेवावी. “फैले प्रेम परस्पर जग में, मोह दूर पर रहा करे” जगात परस्पर प्रेम असावे अशी अपेक्षा पू. जयपुरंदर म.सा. यांनी आजच्या शेवटच्या प्रवचनातून केली.

आपण गुणीजनांसारख्या महान मंगल रुप आत्म्याच्या संपर्कात आलो तरी आपले देखील मंगल होते. जैन दर्शनमध्ये तुमच्यासाठी मंगल रुपात कोण आहे ? हे सांगण्यात आलेले आहे. मंगलचे स्वमंगल, परमंगल आणि लोकमंगल असे ती न प्रकार पडतात. मेरी भावना या रचनेत शेवटच्या तीन कडव्यात लोकमंगल चा विचार करण्यात आलेला आहे. ज्ञान, विवेक, सदाचार, चारित्र्य ह्या गोष्टी माणसाकडे असतील तर ही पृथ्वी सर्वांसाठी स्वर्गसम ठरेल. आज युक्रेनमध्ये युद्ध परिस्थिती आहे खरे तर तिथले सर्व नागरिक भयभीत  झालेले आहेत. युद्ध कुणालाही नको असते परंतु अशा परिस्थितीत माणसाला रहावे लागते.

कृषि संस्कृति आणि अर्थव्यवस्था असलेल्या भारताचे अर्थकारण पर्जन्यवृष्टीवर अवलंबून आहे. पाऊस पडला नाही तर दुष्काळ आणि वाजवी पेक्षा जास्त पाऊस पडला तरी नुकसान होते. त्यामुळे पर्जन्यमान व्यवस्थित असावे अशी अपेक्षाही मेरी भावना मध्ये व्यक्त केलेली आहे. कविने खूप मोठा व्यापक विचार ही रचना करताना केलेला आहे. जळगाव येथील स्वाध्यायभवन येथील जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्य श्री पू. पार्श्वचंद्रजी म.सा. आदिठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम पार पडला.

जयमलजी महाराज साहेब यांचे चरित्र प्रवचनात आठवले गेले. जगात अहिंसा प्रस्थापित व्हावी, सर्व दूर प्रेम असावे. प्रेम व मोह या दोन्ही शब्दांचा अर्थ म.सा. यांनी समजावून सांगितला. प्रेम हे निस्वार्थपणे करायचे असते. अप्रिय, कठोर, कटू शब्द दुसऱ्यासाठी वापरू नये असे मार्गदर्शन करण्यात आले. उत्तम जीवन जगण्यासाठी मेरी भावना सारख्या रचना केवळ वाचून ठेवू नये तर त्यांचे प्रत्यक्ष आचरण करावे.

——□■□■ ——

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.