महिलेचा पाठलाग करून विनयभंग

0

जळगाव;- महिलेचा पाठलाग करत दगड मारून अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याचा प्रकार तालुक्यातील एका गावात १ जून रोजी सायंकाळी ६ वाजता उघडकीस आला . याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील एका गावात २६ वर्षीय महिलाही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २३ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता गावात राहणारा गणेश बाबुराव कोळी यांनी तिचा पाठलाग केला. नंतर तिला दगड मारला. दगड मारण्याचा जाब विचारला असता त्याने महिलेची अश्लिल वर्तन करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने तिथेच आरडा ओरड केली. त्यानंतर तो पसार झाला. पिडीत महिलेने नशिराबाद पोलीस ठाण्यात आरोपी गणेश बाबुराव कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.