महाराष्र्ट सेवा संघ प्रनीत जिजाऊ ब्रिगेड अमरावती च्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमरावती ;राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी मराठा सेवा संघ प्रणीत जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र शाखा अमरावती तर्फे केली जात आहे .  स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तसेच राजभाषा मराठी दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री समर्थ साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रसंगी राज्यपाल भरतसिंह कोशारी यांनी चाणक्यशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल   ?  व रामदास समर्था शिवाय शिवाजीला कोणं विचारेल असे आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे . हा छत्रपती शिवरायांच्या बदनामीच्या योजनेचाच एक भाग आहे . शिवरायांचे कर्तुत्व झाकण्याचा हा प्रकार आहे . एका संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने महापुरुषांचा अपमान करणे अतिशय निंदनीय आहे .

सोळाशे 72 पूर्वी शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाल्याचे कोणतेही पुरावे नसताना . आणि मुंबई हायकोर्ट खंडपीठ औरंगाबाद चे सन्माननीय न्यायाधीश श्री डी .बी. नलावडे व श्री के एल वडाणे या दोन न्यायाधीशांच्या  खंडपीठाने (क्रिमिनल एप्लीकेशन नंबर 995 अाॅफ 2008 , प्यारा नंबर 4) नुसार पुरावा नसताना बिनबुडाचे वक्तव्य फक्त छत्रपती शिवरायांच्या बदनामी करिताच केले गेले असल्याने .

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य असणाऱ्या आणि छत्रपती शिवरायांवर प्रेम करणाऱ्या शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत . आम्ही महाराष्ट्राच्या राज्यपालांचा जाहीर निषेध करतो   भगतसिंग कोशारी यांनी समस्त शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी अशी मराठा सेवा संघ प्रनीत महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड शाखा अमरावती च्या वतीने एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.