कुसुंबामध्ये शेतातील गवताला आग; झोपडी जळून खाक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव (Jalgaon) विमानतळाच्या (Jalgaon Airport) पुढे असलेल्या कुसुंबा (Kusumba) गावाजवळील एका शेतातील गवताला (Field grass fire in Kusumba) अचानक आग लागल्याची घटना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. या आगीत एका कुटुंबाची झोपडी जळून खाक झाली आहे. यावेळी महापालिकेच्या बंबाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

कुसुंबा येथील विमानतळाच्या पुढे असलेल्या एका पेट्रोल पंपाच्या मागच्या बाजूला असलेल्या शेतातील गवताला अचानक लाग लागल्याची घटना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. या संदर्भात जळगाव महापालिकेच्या  अग्निशमन विभागाला (Fire Department of Jalgaon Municipal Corporation) कळविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले.

अवघ्या २० मिनीटात बंब घटनास्थळी पोहचला आणि ही आग विझविण्यात आली. यावेळी या शेतात विलास पावरी (बारेला) कुटुंबिय वास्तव्याला आहे. कुटुंबिय राहत असलेल्या झोपडी देखील आगीत जळून खाक झाली आहे. त्या बारेला कुटुंबियाचे संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. अग्निशमन विभागाचे पथकाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आहे.

यावेळी अग्निशमन बंबाचे वाहन चालक वसंत न्हावी, भगवान जाधव, रविंद्र बोरसे, नितीन बारी यांनी परिश्रम घेतले. या संदर्भात अद्यापपर्यंत पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.