राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत पाऊस बरसत आहे. तर आता पुढील ४८ तासांत राज्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (Maharashtra Rain updates) वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक आणि पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत माहिती दिली की, “येत्या 48 तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसासह काही ठिकाणी अतीवृष्टीचे इशारे. पुढचे 2, 3 दिवस राज्यात पाऊस सक्रीय.”

 

‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, १० ऑगस्ट रोजी राज्यातील ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर गडचिरोली या एका जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे.

हवामानाचा अंदाज

१० ऑगस्ट

कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.

मध्य महाराष्ट्र – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.

मराठवाडा – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

विदर्भ – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

११ ऑगस्ट

कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

मध्य महाराष्ट्र – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

मराठवाडा – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

विदर्भ – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.