उन्हीं जैसी चर्या में यह चित्त सदा अनुरक्त रहें

0

प्रवचन सारांश  –  दि.  10 ऑगस्ट 2022

प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात कुणाला तरी आदर्श मानत असतो. नेता आणि अभिनेता यांना अलीकडे आदर्श मानले जाते. नेता म्हणजे जो सर्वांना सोबत घेऊन चालते ती व्यक्ती. सदवर्तन, मोक्षाच्या दृष्टीने जे स्वतः प्रयत्न करतात व इतरांना देखील तो मार्ग दर्शवतात ते महापुरुष असतात. महापुरुषांचे अनुकरण आपण करायला हवे. उन्हीं जैसी चर्या में यह चित्त सदा अनुरक्त रहें या ओळींचा अर्थ आजच्या प्रवचनात स्पष्ट करून देण्यात आले. मेरी भावना या प्रवचन श्रुंखलेत डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य पू. जयपुरंदर मुनी यांची प्रवचन माला सुरू आहे.

थोर व्यक्तींचे गुण आपण आपल्या जीवनात अनुसरणे आवश्यक आहे. अनुकरण करायचे असेल तर चांगल्या गोष्टींचे अनुकरण अवश्य करावे. आजची परिस्थिती पाहिली असता आपण अंध अनुकरणाने स्व गमावतो की काय अशी भीती वाटायला लागली आहे. पूर्वी फाटके कपडे म्हणजे दारिद्र्याचे लक्षण मानले जात असे परंतु आज  फॅशनच्या नावाखाली श्रीमंतांची मुले-मुली फाटक्या जीन्स पॅन्ट वापरत आहेत. वेश, भाषा, खाद्य संस्कृती इत्यादीबाबत आपली परंपरा, संस्कृती सोडून पाश्चात्य लोकांचे अंधानुकरण करत आहोत. मातृभाषा व मातृभूमी स्वर्गाहून श्रेष्ठ मानली गेली आहे. आज मारवाडी घरात आईला मम्मी व पप्पा बोलले जात आहे. मारवाडी बोली सोडून घरात देखील इंग्रजी भाषा वापरली जात आहे. इंग्रजी भाषा म्हणजे जगाची भाषा आहे ती आलीच पाहिजे परंतु तिचा ज्ञान भाषा म्हणून उपयोग करायला हवा. सामान्य घरात बोलताना आपली मातृभाषा उपयोगात आणली पाहिजे. तुमची चर्या ही महापुरुषांप्रमाणे, आत्म्याचा विकास करण्याच्या दृष्टीने करायला हवा असे आवाहन करण्यात आले.

जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्यश्री पू. पार्श्वचंद्र जी म.सा आदीठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात स्वाध्यायभवन येथे चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. आगम गाथेवर आधारीत प्रवचन मालेत आजच्या प्रवचनात पू. जयधुरंधर मुनी यांनी क्रिया करत असताना विवेक जोडला पाहिजे. तसे केले तर कर्मबंध तोडता येतात. बोलणे व खाणे यामध्ये देखील विवेक असायला हवा. बोलणे व खाणे या दोन्ही गोष्टीत पण आपण विवेकाने वागले पाहिजे. डोळे, कान हे दोन दोन असतात परंतु जीभ एकच असते ती बोलण्याचे व खाण्याचे काम करते. त्यामुळे जिव्हा नियंत्रण अत्यंत आवश्यक असल्याचा मोठा संदेश आजच्या प्रवचनातून दिला गेला.

आहार भोजन का करावे याचे सहा कारणे आगमग्रंथात दिलेले आहेत. क्षुधा शांत करणे, सेवा करण्यासाठी, इर्या म्हणजे पायी चालणे यासाठी भोजन आवश्यक, जगण्यासाठी, संयम व धर्म आराधना करणे अत्यंत आवश्यक आहे. आज मात्र जगण्यासाठी नव्हे तर खाण्यासाठी जणू जीवन जगत आहेत असे वाटते. बोलणे व खाण्यात संयम आवश्यक आहे असे ही पू. जयधुरंधर मुनी यांनी सांगितले.

—– ¤¤——

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.