राज्यात पुढील ३ दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशासह राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र पुन्हा काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. या १५ ते २० दिवसांमध्ये राज्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे काही भागांत पूरपरिस्थितीही निर्माण झाली होती.

दरम्यान, पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने येत्या 2 ते 3 दिवसांत राज्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज दिला आहे.  अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून दिली आहे.

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1552138734291656705?s=20&t=HUxbHYSWenJRoQItKViCWA

या महिन्याच्या सुरुवातील पडलेल्या पावसाने कोकणात चागंलीच हजेरी लावली. कोकण, विदर्भ, मुबंई, पालघर, रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा अधिक प्रभाव जाणवला आहे. त्यामुळे अनेक धरणांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. दरम्यान, या दोन ते तीन दिवसांत होणाऱ्या पावसाचा मुंबई, ठाणे भागात प्रभाव अधिक असणार नाही, अशी माहितीही हवामान खात्याने दिली आहे.

तसेच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर,अहमदनगर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.