ओडिसामध्ये बसला अपघात; महानदी पुलावर मधोमध अटकली…

0

 

कटक, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

ओडिशाच्या कटक जिल्ह्यात मंगळवारी तीस प्रवास्यांना घेऊन जाणारी बस महानदीवरील पुलाच्या भिंतीवर आदळली आणि बराच वेळ मधोमध लटकली. या नंतर लोकांना वाहनातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. अशी माहिती पोलिसांनी दिली. बांकी पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक काबुली बारिक यांनी सांगितले की, बस अंगुलहून भुवनेश्वरला जात असताना सकाळी 10.30 वाजता जातीमुंडिया-सुवर्णपूर पुलावर हा अपघात झाला.

बस पुलावरून लटकली होती

बस चालक श्रीकांत बेहेरा म्हणाले, मी ब्रेक लावला आणि बस नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला तरी ती पुलाच्या काठावरील भिंतीवर आदळली. बसची पुढील दोन चाके पुलावरून लटकली होती. इतर वाहनांमध्ये प्रवास करणारे लोक बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी थांबले.बारिक यांनी सांगितले की, चालकासह सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही, ते म्हणाले, नंतर बस पुलावरून काढण्यात आली. यावेळी प्रवासी चांगलेच धास्तावले होते.

ही बस अंगुलहून सकाळी ७.४५ वाजता निघाली होती आणि ती भुवनेश्वरला दुपारी १२ वाजता पोहोचणार होती. बस आणखी पुढे गेली असती तर पुलावरून खाली पडून मोठा अपघात झाला असता, असे एका स्थानिक व्यक्तीने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.