मनवेल येथे स्वामी रेवानंद गुरु केशवानंद धुनीवाले दादांजी यांच्या पुण्यतीथी सोहळ्यांचे आयोजन

30 क्विंटल गव्हाच्या पोळ्या,२५ क्विंटल भाजीचा होणार महाप्रसाद

0

 

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क

हजारो भावीकांचे श्रध्दास्थांन असलेल्या श्री रेवानंद स्वामी यांच्या श्रांध्द सोहळ्यांचे आयोजन दि.७ आॕक्टोबंर रोजी शनिवारी मनवेल येथील धुनीवाले दादांजी दरबारात आयोजित करण्यात आला आहे.

दरवर्षी अविधवा नवमीला स्वामी रेवानंद गुरुकेशवानंद धुनीवाले दादांजी यांचा श्राध्द सोहळा मनवेल ग्रामस्थ मोठ्या उत्साहात साजरा करीत असुन सोहळ्यांची तयारी पुर्णत्वांकडे आली असुन मनवेल गावाला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

रेवानंद स्वामी याच्या श्राध्द सोहळा दि.७ आॕक्टोबर रोजी साजरा होत असून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वा.आरती, ८वा.सेवा,.१० वा.होम, हवन सेवा व दुपारी १२ वाजेपासून महाप्रसाद, साय.४ वा.गावातपालखी मिरवणूक रात्री ८ वा.महाआरती.व १० वाजेपासून रात्रभर भजन गायनचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मनवेल येथे रेवानंद स्वामीचे काही दिवस वास्तव्य होते.अविधवा नवमीच्या दिवशी त्यांनी १९३९ या वर्षी मध्य प्रदेशातील बरहापुर जिल्ह्यातील अंबाडा या गावी समाधी घेतली आहे.त्या दिवसापासुन मनवेल येथे रेवानंद स्वामी श्राध्द सोहळा साजरा करण्यात येत आहे.

मनवेल येथील जुन्या जानकारांकडुन आख्यायिका सागण्यात येते की रेवानंद स्वामी यांचा रीद्धी सिध्धी बाबत अनेक चमत्कारिक गोष्टी सागण्यात येतात.विशेष म्हणजे मनवेल गावात वास्तव्य झाले असल्याने गावात कोप दुष्काळ साथ आजार उपासमारी पाणी टंचाई उद्भवली नाही. अशी श्रध्दा भावीकांमध्ये आहे.

या कार्यक्रमास दगडी, साकळी, थोरगव्हाण, पिळोदा, पथराडे, शिरागड, शिरसाड येथील भावीकांचे सहकार्य लाभते.

या सोहळ्यानिमित्त साकळी मनवेल मोफत प्रवास, साकळी येथे बापु धोबी यांचा कडुन शिरा पोहे वाटप, मनवेल येथील महर्षि वाल्मीक मित्र मंडळा कडुन पोहे वाटप, विठ्ठल मंदिरा जवळ चहा वाटप ,व रत्तदान शिबबीरासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

गेल्या आठवड्या पासुन सोहळ्यांची तयारी सुरु आहे ३० हजार भावीक दरवर्षी येतात वरण पोळी व गंगाफळाची भाजी महाप्रसाद असतो.गंगाफळाची भाजी भावीक आवर्जून खातात व घरी प्रसाद म्हणून नेतात.

मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.गावातील तरुण मंडळी दादांजी भजनी मंडळ व ग्रामस्थ सोहळ्यांची तयारीत लागले असुन बाहेर गावी नोकरी करणारे नागरिक लोकप्रतीनीधी अधिकारी राज्यभरातील दादाजी भत्त गणाचे आगमन होत असून भावीकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दादांजी भजनी मंडळ दगडी / मनवेल ग्रामस्थ यानी केले आहे.

 

या सोहळ्याचे नियोजन व सामाजिक सलोख्याने साकळी, थोरगव्हाण, शिरसाड, दगडी ,पथराडे, शिरागड ,पिळोदा खुद्द येथील नागरीक आपआपल्या परीने सहकार्य करीत असतात या कार्यक्रमाला महाराष्ट्र सह मध्य प्रदेशातील दादाजी भक्तगण मोठ्या सख्येने हजेरी लावतात.

परीसरात गव्हाचा पिठाचे वितरण होते दरवर्षी गहु वाढवून दळले जाते व सात गांवामध्ये पिठ वाटप करुन प्रत्येक घरुन पोळ्या जमा करण्यासाठी स्वंतत्र वाहनाने पोळ्या जमा केल्या जातात.

Leave A Reply

Your email address will not be published.