संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के; नेपाळमध्ये ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 6.2 असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ असल्याचे नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरने म्हटले आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, नेपाळमध्ये आज दुपारी 2:25 वाजता भूकंप झाला.

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता खूप होती. अशा परिस्थितीत लोक घर आणि कार्यालयातून बाहेर पडले. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरने सांगितले की, भूकंपाची तीव्रता 6.2 होती आणि त्याचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये पाच किलोमीटर खोलीवर होता. त्याचबरोबर राजस्थानच्या जयपूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. येथे दुपारी 2.55 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्याने लोक घाबरले आणि इमारतींमधून बाहेर पडले आणि सुरक्षित ठिकाणी गेले.

दिल्ली संवेदनशील झोनमध्ये आहे

देशाची राजधानी दिल्ली भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील मानली जाते. शास्त्रज्ञांनी भारतातील भूकंप क्षेत्राची विभागणी झोन-२, झोन-३, झोन-४ आणि झोन-५ अशी केली आहे. झोन-5 मधील क्षेत्र सर्वात संवेदनशील मानले जातात, तर झोन-2 हे सर्वात कमी संवेदनशील मानले जातात. देशाची राजधानी दिल्ली झोन-4 मध्ये येते. येथे 7 पेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंप देखील होऊ शकतात, ज्यामुळे मोठा विध्वंस होऊ शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.