महादेव मंदिरातील त्रिशूल , कळशी , नाग चोरटयांनी लांबविला

0

जळगाव ;- भिकमचंद जैन नागहर येथे एका घराच्या आवर असणाऱ्या खासगी महादेव मंदिराचे त्रिशूल आणि कळशी अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी , राजेश राघिवीर गुप्ता यांचे भिकमचंद जैन नगरात प्लेट नंबर चार असून यात त्यांच्या घराच्या वारात महादेवाचे मंदिर असून अज्ञात चोरट्याने १ हजार किमतीचे पितळी त्रिशूल आणि १५०० किमतीची तांब्याची कळशी , ५०० रुपये किमतीचा नाग असा एकूण ३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ विजय निकुंभ करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.