अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि ट्रॉली जप्त

0

जळगाव ;- तालुक्यातील आव्हाने गावाजवळ अवैधरित्या एक ब्रास वाळू घेऊन जाणारे ट्रॅक्टर आणि ट्रॉली तालुका पोलिसांनी जप्त केली असून याबाबत प्रदीप राजेंद्र कोळी वय २५ रा, विरवाडे ता. चोपडा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली मराठीत अशी कि, स्वराज कंपनीचे ३ लाख रुपये किमतीच्या ट्रॅक्टरमधून ३ हजार किमतीची एक बार्स वाळू आणि विना क्रमांकाची ट्रॉली जप्त केल्याची कारवाई २२ जून रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास तालुका पोलिसांनी केली असून पोना मनोज पाटील यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ संजय भालेराव करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.