महागाईचा फटका.. घरगुती गॅस सिलेंडर महागले; मोजावे लागणार इतके रुपये

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या रशिया आणि युक्रेनमधील तणावामुळे युद्ध सुरु आहे. याचा सर्वच जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला. अनेक गोष्टी महाग झाल्या. तसेच कच्च्या तेलाच्या किंमतीत देखील मोठी वाढ झाली. त्यातच भर आता घरगुती गॅस सिलेंडरही महागला आहे. यामुळे चारही बाजूने सर्व सामान्यांना महागाईचा मोठा फटका बसत आहे.

५० रुपयांनी वाढ

रशिया युक्रेन युद्धामुळे घरगुती गॅस सिलेंडरचे भाव वाढले असून १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून एलपीजी सिलेंडरचे दर स्थिर होते. ६ ऑक्टोबर २०१९ ला एलपीजी सिलेंडरचे दर वाढवण्यात आला होता.

दिल्लीमधील दर

दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी ९४९ रुपये ५ पैसे मोजावे लागत आहेत. याआधी ८९९ रुपये ५० पैसे मोजावे लागत होते.

मुंबई आणि चेन्नईमधील दर

मुंबईमध्ये देखील एलपीजीचा दर वाढला असून आता ८९९ रुपये ५ पैशांच्या जागी ९४९ रुपये ५ पैसे मोजावे लागणार आहेत. चेन्नईत हा दर ९६५ रुपये ५ पैशांवर आहे.

कोलकाता आणि लखनऊमधील दर

तसेच पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरचा दर वाढून ९७६ रुपये झाला आहे. याआधी हा दर ९२६ रुपये होता. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत दर ९३८ वरुन थेट ९८७ रुपये ५ पैसे झाला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.