राष्ट्रीय लसीकरण व आशा दिनी सावित्रीच्या लेकींचा सत्कार

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

देशात कोरोना सारख्या सद्रुश्य महामारीने अक्षरशः मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. त्याची झळ नागरिकांना आज पावेतो सहन करावी लागली. आपण आजही कोरोना रुपी दानाचा सामना करतोय. अशा या भयंकर महामारीत आपला जीव धोक्यात घालून कठीण परिस्थितीत रात्रंदिवस नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन आरोग्य विभागाचे कर्मचारी विशेष सर्वेक्षण काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य परिचारिका यांनी महत्वाची भुमिका बजावली.

कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य खरचं कौतुकास्पद आहे. जामनेर पंचायत समिती येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयात राष्ट्रीय लसीकरण दिवस व जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय लसीकरण, आशा डे त्याचप्रमाणे जागतिक महिला दिनानिमित्त सावित्रीच्या लेकिंचा मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

लसीकरणाबद्दल जागरूकता करण्यासाठी मार्च महिन्यात राष्ट्रीय लसीकरण दिनाचे आयोजन करण्यात येते. तसेच वर्षभर कामकाज करणाऱ्या आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांनी केलेल्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने आशा डे साजरा करण्यात येतो.

या वर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पोलिओ लसीकरण मोहीम कोरोना लसीकरण मोहीम व नियमित लसीकरण मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच महिला दिनानिमित्त महिला पत्रकार मीनल चौधरी, मीना शिंदे, आश्विनी चौधरी, प्रा. शीतल पाटील, ललिता गावंडे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ईश्वरलाल जैन बँकेचे चेरमन एवं सामाजिक कार्यकर्ते कचरूलाल बोहरा तर प्रमुख पाहुणे म्हणून तर जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ, प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्राच्या ब्रम्हकुमारी सुषमा दीदी, जामनेर डॉक्टर संघटनेचे डॉ. प्रशांत भोंडे, जामनेर तालुका निमाचे अध्यक्ष डॉ. नंदलाल पाटील, गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे, महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी पद्म परदेशी, निशा तेली हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी केले तर सूत्रसंचालन रवींद्र सूर्यवंशी यांनी केले. डॉ. पल्लवी राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमात १४ वैद्यकीय अधिकारी, १ प्रयोगशाळा अधिकारी, १ औषध निर्माण अधिकारी, ३ आरोग्य सहाय्यिका, ८ आरोग्य सेविका, ३ गटप्रवर्तक, ४० आशा, ३५ अंगणवाडी सेविका यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. कोमल देसले, डॉ. मनोज पाटील, डॉ. मनोज तेली, डॉ. दानिश खान, डॉ. शुभम सावळे, बशीर पिंजारी, आशा कुयटे, शिवली देशमुख, अनुराधा कल्याणकर, प्रदीप पाटील, व्ही. एच. माळी अंगणवाडी पर्यवेक्षिका पुष्पा धनगर, शीला पाटील, शोभा पाटील, भारती भिसे, जया नाईक, वाकोडे गोकर्णा, आशा तेजकार, व सर्व गटप्रवर्तक यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.