महागाईचा झटका.. LPG सिलेंडर तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागले

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

देशात सध्या दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. जीवनावश्यक वस्तूंपासून ते सर्वच गोष्टींच्या किमती वाढतच आहेत. त्यात आणखी एक महागाईचा झटका बसल्याने सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.

आता पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. गॅस सिलेंडरच्या दरात अलीकडच्या काळात सातत्याने चढ उतार होत आहेत. त्यामुळे नागरिकांवर गॅस सिलेंडर जपून वापरण्याची वेळ आली आहे. मात्र, आता 14.2 किलो गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. आता गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच आजपासून घरगुती गॅस सिलेंडर हा 999.50 रुपयांना मिळणार आहे. एकीकडे इंधन दरवाढीमुळे नागरिक हैराण आहेत त्यातच आता एलपीजीच्या दरवाढीमुळे नागरिक हतबल होणार आहेत.

दरम्यान यापूर्वी देखील एलपीजीच्या किमतीमध्ये 102 रुपयांची वाढ करण्यात आली होती. यानंतर गेल्याच महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये एलपीजीच्या किमतीमध्ये 268 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.