नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
दिवाळीच्या पाश्वभूमीवर मोठी खुशखबर आहे. एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी 19 किलोग्राम व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. 16 नोव्हेंबरपासून लागू झालेल्या सिलिंडरच्या किंमती 57.5 रुपयांनी कमी झाल्या आहेत. या चार शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईचा समावेश आहे.
सुधारित किंमतींनुसार, 19 किलो व्यावसायिक LPG सिलेंडरची किंमत नवी दिल्लीत 1,775.5 रुपये, कोलकात्यात 1,885.5 रुपये, मुंबईत 1,728 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,942 रुपये असेल. व्यावसायिक एलपीजीच्या किंमती कमी झाल्या असल्या तरी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती मात्र कायम आहेत.
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतील कपातीमुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स यांसारख्या व्यवसायांवरील भार कमी होण्याची अपेक्षा आहे.