अज्ञात दुचाकीची प्रौढास धडक, प्रौढ जागीच ठार

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

जामनेर तालुक्यातील फत्तेपूर परिसरातील कसबा पिंप्री येथील रहिवासी नजीर मुराद तडवी (वय ६०) या प्रौढाला १४ नोव्हेंबर रोजी रात्री राज्य मार्ग क्र. ४६ वरील पोलीस पाटील समद तडवी यांच्या शेताच्या पश्चिमेस अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, मृत नजीर तडवी हे दररोज संध्याकाळी शेतात जात असून, रात्री ते शेतातच झोपत असे. सकाळी उशिरापर्यंत नजीर तडवी घरी आले नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी अपघातस्थळाची पाहणी केली. तेथे प्रथमदर्शी अपघात झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. मात्र, नातेवाईकांनी अपघात की घातपात असा संशय घेतल्याने या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात करण्यात आली आहे. तर मृतदेह उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अपघातस्थळी पो. नि. किरण शिंदे यांनी भेट दिली. या घटनेचा तपास पो. उपनिरीक्षक संजय बनसोड करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.