पोटच्या गोळ्यानेच घेतला बापाचा जीव !

0

सोलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

दारूच्या आहारी जाऊन होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागत नाही. दारूमुळे भरपूर जणांचे संसार उध्वस्थ होतांना पहिले आहे. अशीच एक भयानक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. वडील नेहमी दारू पिऊन घरच्यांना शिवीगाळ करून मारहाण करीत असे. हा त्रास सहन न झाल्याने पोटाच्याच मुलाने आपल्या वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्या केल्यानंतर मुलाने मृतदेह शिंगणापूर घाटात फेकून दिला. या संपूर्ण प्रकारांचा अवघ्या १२ तासांत सोलापूर ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या मदतीने उलगडा केला. आरोपीस अटक करण्यात आली आहे.

सविस्तर माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील शिंगणापूर नातेपुते रोडवर भवानी घाटात १५ नोव्हेंबरला अनोळखी इसमाचा खून झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. पोलिसांनी मृताच्या कुटुंबियांशी संबंध साधला त्यावेळी मृत व्यक्तीचा मुलगा सुरज सावंत याने मृतदेह ओळखला. तसेच सुरज पांडुरंग सावंत याच्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास करण्यात सुरूवात केली

तपासात गोपनीय माहिती मिळाल्यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी मयताचा मुलाला ताब्यात घेतेले असता, त्याने खून का केला? यामागील कारण सांगत आपला गुन्हा कबुल केला. या गुन्ह्यात मृत पांडुरंग सावंत यांची पत्नी संगीता हिचा देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने तिला देखील अटक करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.