लोककला टिकवायची असेल तर तिला स्वीकारणं अत्यंत गरजेचं; मिस हेरिटेज २०२२ गायत्री ठाकूर यांचे प्रतिपादन

आपली संस्कृती खूप विशेष अशी आहे, तिला जपणं गरजेचं डॉ. श्रद्धा पाटील

0

 

नवरात्री विशेष जागर संस्कृतीचा

 

कु. गायत्री ठाकूर, मिस हेरिटेज २०२२

डॉ. श्रद्धा पाटील, स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ

 

हल्लीचा काळ खूप बदलतोय. आपणही काळानुरूप बदलतोय, अनेक नवनवीन गोष्टी स्वीकारतोय. हे बदल ग्लोबली प्रेझेंट होण्यासाठी म्हणजेच जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. हे बदल नक्कीच स्वीकारावे, मात्र आपण आपल्या संस्कृतीला विसरून चालणार नाही. आपण सर्व सण उत्सव साजरी करतो, मात्र त्यातली सांस्कृतिकता जोपासत नाही. आपल्या संस्कृतीत अनेक लोककला आहेत आणि या लोककला टिकवायच्या असतील तर त्या लोककलेला स्वीकारलंच पाहिजे, तरच ती टिकू शकते. ती लोककला समजून घेतली, तिला तिच्या महत्त्वाने स्वीकारली तर ती तुम्हाला कधीही चुकीची वाटणार नाही. लोककला स्वीकारायच्या असतील तर तिला मूळ पद्धतीने स्वीकारला पाहिजे, असं पती प्रतिपादन मिस हेरिटेज २०२२ गायत्री ठाकूर यांनी केले.

लोकशाहीच्या कार्यालयात नवरात्रोत्सवानिमित्त जागर संस्कृतीचा या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मिस हेरिटेज २०२२ गायत्री ठाकूर आणि स्त्रीरोग वंद्यत्व निवारण तज्ञ डॉ. श्रद्धा पाटील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी जागर संस्कृतीचा या विषयावर आपले मत मांडले.

त्यावेळी बोलताना गायत्री ठाकूर म्हणाल्या, आपण आपल्या लोककला जपल्याच पाहिजेत उदाहरण घ्यायचं झालं तर हल्ली लावणीचे स्वरूप बऱ्याच प्रमाणात बदललेलं दिसून येतंत. खऱ्या लावणीच्या जागी डीजे वाल्या लावणीने घेतली आहे. त्यामुळे लावणीला चुकीच्या अंगाने घेतलं जातंय. कारण लावणीतलं मूळ सांस्कृतिकीकरण हरवलं आहे. लावणीही अश्लील नाही किंवा वाईट नाही मात्र तिला आपण चुकीच्या पद्धतीने पाहतो. हे वाईट आहे. त्यामुळे या लोककला स्वीकारायच्या असतील तर त्यांना मूळ पद्धतीने स्वीकारला पाहिजे.

आपण पाश्चात्य संस्कृतीला आपल्यापेक्षा बोल्ड मानतो. मात्र आपला मूळ भारतीयपणा हा देखील तितकाच बोर्ड आहे, आणि हे पूर्वापार चालत आला आहे. त्यामुळे आपल्याला हे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारावंच लागेल. इतिहासात देखील जाऊन पाहिलं, तरी अनेक बोल्डपणा दिसून येतो. त्यामुळे आपल्याला पाश्चात्य संस्कृतीची विशेष अशी गरज नाही. तुम्हाला आधुनिक राहायचं असेल, तर आपल्या परंपरा देखील तितक्याच आधुनिक आहेत. हे देखील विसरून चालणार नाही. तरुणांनी देखील याला समजून घेणे गरजेचे आहे.

हल्ली नवरात्रोत्सवात आपण गरबा खेळतो मात्र गरबा खेळताना बऱ्याचदा स्त्रियांकडे चुकीच्या नजरेने पाहिलं जातं. असं होऊ नये. गरबा मनोरंजनाच्या माध्यमातून खेळतो, तो तसाच आपण खेळला पाहिजे. त्यात देखील सांस्कृतिकता जपली पाहिजे. मात्र यातून महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन चुकीचा नसावा, हे अत्यंत गरजेचे आहे, असे त्या  म्हणाल्या.

यावेळी बोलताना डॉ. श्रद्धा पाटील यांनी सांगितले, आपण आपल्या वाटवडलांपासून चालत आलेल्या संस्कृतीला जपायला पाहिजे. आपण व्यावसायिक आपल्या जीवनात कितीही व्यस्त असलो तरी तिला जपणे अत्यंत गरजेचे आहे. आई-वडिलांच्या पाया पडणे, नव्याने आणलेल्या किंवा मिळालेल्या गोष्टींना प्रथम देवाला अर्पण करणे यांसारख्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आपली संस्कृतीकता जपू शकतो. आपली संस्कृतीकता खूप विशेष आहे. तिचं पाश्चातीकरण होता कामा नये. आपल्या संस्कृती देखील विशेष अशाच आहेत. मी एक स्त्रीरोग तज्ञ आहे, त्यानुसार सांगेल की, आपल्या संस्कृतीत सांगितल्याप्रमाणे गर्भसंस्कार ही अत्यंत फायदेशीर अशी गोष्ट आहे. गर्भधारणेत यामुळे अत्यंत सकारात्मक असा परिणाम दिसून येतो. त्यामुळे गर्भधारणेत संस्कारीकरण करायचं असेल तर गर्भसंस्कार हे देखील फायदेशीर ठरतात.

 

शब्दांकन

राहुल पवार

Leave A Reply

Your email address will not be published.