कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन १ पासून सावधान

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

कोरोना महामारीच्या हद्दपारनंतर दीड वर्षांनी कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन १ चे रुग्ण जगात, भारतात तसेच महाराष्ट्रात आढळले आहेत. नुकताच काल भुसावळ तालुक्यात एक रुग्ण आढळला अस्जून त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. जेएन १ वर नियंत्रण ठेवण्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. दीड वर्षापासून कोरोना वरील उपचारासाठी शासकीय तसेच खाजगी रुग्णालय सज्ज असलेल्या रुग्णालयांना पुन्हा सज्ज करण्याच्या सूचना शासनाच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आलेले आहेत. कोरोना काळात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट उभारण्यात आले होते. परंतु महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लांट बंद पडलेले असल्याने ते पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुदैवाने जळगाव जिल्ह्यात उभारण्यात आलेले तीन ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट चालू आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासाठी ऑक्सिजनची समस्या राहणार नाही. परंतु शासकीय तसेच खाजगी रुग्णालयामध्ये कोरोना नियंत्रणासाठी अथवा कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जी सजगत हवी ती पुन्हा पुरवत करण्याच्या योजना शासकीय पातळीवरून सुरू करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यात एक कोरोना व्हेरियंटचा जेएन १ व्हेरियंटचा रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्याही वेळेस त्याचा संसर्ग वाढण्याची शाश्वती नसल्याने रुग्णालयातील यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे. त्यामुळे त्याचे नियंत्रण लवकर करणे शक्य होईल. कोरोनाचा संसर्ग केव्हाही पसरू शकतो. त्यासाठी त्याचे नियंत्रणा संदर्भात आधीच योग्य ती काळजी घेणे गरजेचे असल्याने आरोग्य यंत्रणेला सतर्क राहणे आवश्यक आहे.

 

मागील कोरोना महामारीच्या काळात कोरोना यंत्रणा अनभिज्ञ असल्याने कोरोना संसर्ग झपाट्याने पसरला आणि रुग्ण संख्या प्रचंड वाढली होती. ऐनवेळी रुग्णालयात सुविधा उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणाची धावपळ झाली. शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात बेडची व्यवस्था नसल्याने अनेक कोरोनाग्रस्त रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने जमिनीवर झोपवून उपचार करण्यात आले होते. त्याचबरोबर पीपीई किट पुरेशी उपलब्ध नसल्याने अनेक उपचार करणारे डॉक्टरांना तसेच परिचारकांना कोरोनाची लागण झाली होती. काही डॉक्टर आणि परिचारिकांना आपले प्राण देखील गमावे लागले होते. ऑक्सिजनचा पुरेसा साठा नसल्याने ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना प्राणास मुखावे लागले. कोरोनाची लागण झाल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, याची चाचणी तातडीने होऊ शकत नाही. नाशिक, औरंगाबाद, पुणे, नागपूर आणि मुंबई या ठराविक ठिकाणी कोरोना चाचणीचे केंद्र उपलब्ध असल्यामुळे रुग्णाच्या रक्ताचे नमुने पाठवल्यानंतर आठ दिवसांनी चाचणी रिपोर्ट उपलब्ध व्हायचे. त्यामुळे अंदाजे रुग्णांवर उपचार केले जात होते. परंतु युद्ध पातळीवरून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी चाचणी केंद्र उभारण्यात आले. परंतु त्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागल्याने अनेक कोरोना सदृश्य रुग्णांनाही रुग्णालयात दाखल करून उपचार केले जात असल्याने रुग्णालये अपुरी पडत होती. परंतु कोरोना तपासणी आता जिल्ह्याच्या ठिकाणीच तातडीने उपलब्ध होत असल्याने कोरोनाची लागण झाली किंवा नाही हे देखील तातडीने कळते. त्यामुळे आता त्याही बाबतीत आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.

 

मागील कोरोना महामारीच्या काळात कोरोनाची लागण होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घेतली. त्यामुळे अनेकांचा त्यापासून बचाव झाला. त्यासाठी जनतेने कोरोनाच्या नवीन व्हेरियंट जेएन १ च्या नियंत्रणासाठी शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता स्वतःची काळजी अत्यंत बारकाईने घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्यांना सर्दी, पडसे, खोकला, ताप, डोकेदुखीची बाधा होत असेल त्यांनी तातडीने रुग्णालयात दोन तपासून घेणे अत्यावश्यक आहे. विशेषतः जेष्ठ नागरिकांनी जे साठ वर्षे वयापेक्षा जास्तीचे वयाचे आहेत, त्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यांना अस्थमा, दमा अथवा फुफुसाचे आजार आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना आरोग्य विभागाने केलेल्या आहेत. मागील कोरोना काळात ज्यांनी दोन डोस घेतले असतील आणि बूस्टर डोस घेतला नसेल त्यांनी आता बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे. तसेच ज्यांनी डोस घेतले नसतील त्यांनी तातडीने डोस घेणे गरजेचे आहे. याबरोबर सतत हात धुणे, तोंडाला मास्क लावणे, गर्दीत जाणे टाळणे या बाबींचे पालन केल्यास उत्तमच.. सध्या थंडीची लाट सुरू आहे. या थंडीची बाधा होऊ नये याची काळजी घ्यावी. थंडीच्या बाधीने सर्दी, खोकला, पडसे ताप, डोकेदुखी होत असेल तर तातडीने डॉक्टरांना दाखवून त्यावर उपचार घ्यावे आणि डॉक्टरांचा सल्ला पाळावा. म्हणजे कोरोनाचा जे नवीन व्हेरियंट जेएन १ हा व्हायरसची लागण होणार नाही. जळगाव शहर तसेच जिल्ह्यातील जनतेने कोरोनाच्या नवीन व्हेरीएंट जेएन १ या व्हायरसला हद्दपार करण्यासाठी सज्ज राहावे हेच या निमित्ताने आवाहन करण्यात येत आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.