लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरोनाच्या नवीन लक्षणांमध्ये घशाची खवखव होत असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होत. यामुळे आवाज जाण्याची भीती देखील अनेकांमध्ये होती. आता अमेरिकेत असच एक प्रकरण समोर आलं आहे. कोविड मुळे एका १५ वर्षाच्या मुलीचा आवाज गेला आहे.
अमेरिकेतील एका रुग्णालयात १३ दिवसांपूर्वी या तरुणीला दाखल करण्यात आलं होत. तिला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होत. तसेच तिला श्वास घेण्यातही अडचण येत होती. यानंतर हळू-हळू- तिचा आवाज गेला. एंडोस्कोपिक चाचणीत असं दिसून आलं की तिला बायलॅटरल व्होकल पॅरालिसिस झाला आहे.
मासाचुसेट्स आय अँड इअर हॉस्पिटलमधील संशोधकांनी याबाबत अधिक रिसर्च केला आहे. यामध्ये पॅरालिसिस अन्य आजारामुळे नाही तर, कोरोनामुळेच झाल्याचा निष्कर्ष समोर आला. पीडियाट्रिक्स नियतकालिकामध्ये हा रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे. दि हिंदूने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.