श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनानिमित्त जळगावसह जिल्ह्यात उत्साह

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे भगवान श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापने निमित्त देशभरात सर्वत्र आनंदोत्सव साजरा होतोय. भगवान श्रीरामावर श्रद्धा असलेल्या देशातील तसेच विदेशातील रामभक्तांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते श्रीरामाच्या भूमीवर विधिवत अभिषेक होणार आहे. लाखो भाविक या प्रतिष्ठापनेच्या लाभ घेण्यासाठी आयोध्येत दाखल झाले आहेत. अनेकांची इच्छा असूनही ते अयोध्येत होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे जाऊ शकत नाहीत. ज्यांना 22 तारखेला उपस्थित राहणे शक्य नाही ती सर्व भविक मंडळी आपापल्या गावात, शहरात राहून आनंदोत्सव साजरा करत आहे. गेल्या तीन चार दिवसापासून भाविक मंडळी घरोघरी जाऊन या प्रतिष्ठापन सोहळ्याच्या अक्षता वाटप करत आहेत. जळगाव शहरासह जिल्ह्यात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. जळगाव शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकात झगमगाट निर्माण करण्यात आला आहे. शहरातील चार प्रमुख चौकात आणि तीन उद्यानांची सजावट जैन उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आली आहे. प्रभू श्रीरामाचे भव्य कट आउट उभारून विजेची रोषणाई करण्यात आली आहे. जुने जळगाव आतील श्रीराम मंदिर संस्थांच्या वतीने अखिल जुने जळगाव सजविण्यात आले असून ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. रस्त्यावर कायमस्वरूपी राहतील अशा आकर्षक रांगोळ्या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांचे आकर्षण ठरत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून श्रीराम मंदिर संस्थान तर्फे सजावटीचे काम केले जात आहे. श्रीराम संस्थांचे गादीपती मंगेश महाराज यांचे नेतृत्वात संस्थांच्या सर्व सदस्यांकडून जातीने लक्ष देऊन सजावट करून घेतली जात आहे. श्रीरामाचे पदस्पर्श झालेले जुने जळगाव येथील श्रीराम संस्थान पवित्र असल्याने भाविकांमध्ये उत्साह संचारणे साहजिक आहे. केवळ सजावटीवर भर न देता प्रभू श्रीरामाचे चरित्र सर्वांनी आत्मसात केले पाहिजे, म्हणून चिमुकले मंदिराचे विश्वस्त दादा महाराज जोशी यांच्या श्रीराम कथेचा पाच दिवसांचा कार्यक्रम आयोजित करून भाविकांना त्याचा लाभ घेता येणार आहे. एकंदरीत गेल्या अनेक वर्षापासून अयोध्येतील राम जन्मभूमीत भव्य अश्या राम मंदिराची उभारणी करून तेथे रामाच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना होतेय. त्यामुळे भगवान श्रीरामाच्या भक्तगणाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे यात शंका नाही. कोट्यावधी रुपयांचा खर्च करून अयोध्येतील उभारण्यात आलेले राम मंदिर म्हणजे एक आश्चर्य असे शिल्प बनले आहे. या मंदिर उभारणीसाठी गावातील भाविकांपासून ते श्रीमंत भाविकांकडून आर्थिक हातभार लावण्यात आला आहे. त्यामुळे श्रीराम भक्तांचे ते आकर्षण केंद्र बनले आहे.

सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी होत असलेल्या श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या मूर्ती प्रतिष्ठापने संदर्भात टीकाटिप्पणीचे राजकारण केले जात आहे. मंदिराचे काम अपूर्ण अवस्थेत असताना अर्धवट मंदिरात देवाची प्रतिष्ठापना करणे शास्त्रीय दृष्ट्या योग्य नाही, म्हणून वादविवाद केला जातोय. त्यात हिंदू धर्माचे सर्वोच्च पदी असणारे चार शंकराचार्यांचेही याला सनातन हिंदू धर्माची मान्यता देता येणार नाही, असे म्हणणे आहे. शंकाराचार्यांकडून राजकारण केले जात नसले तरी त्यांचा आधार घेऊन विरोधकांकडून पंतप्रधान मोदींवर टीका केली जात आहे. श्रीरामाला राजकारणात भरडणे योग्य नाही. म्हणून राम मंदिरात होणाऱ्या श्रीराम मूर्तीच्या प्रतिष्ठापणेला विरोध करण्यातून काही निष्पन्न होणार नाही. कारण प्रतिष्ठापनेच्या मुहूर्त ठरला आणि तो दिवस समीर आला असताना आता तो रद्द होणे शक्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देवाचे प्रतिष्ठापना करणे हिंदू धर्मशास्त्रात बसत नाही, अशीही टीका झाली. परंतु ही सर्व टीका जुगारून येत्या 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते श्रीराम मूर्तीचे विद्युत प्रतिष्ठापना होणार आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी हा राम मंदिर सोहळा घडवून आणत आहेत, असाही आरोप केला जातोय. परंतु भारतीय नागरिकत असले आणि विशेषतः रामभक्त हे सुज्ञ आहेत. त्यामुळे होणाऱ्या एका चांगल्या सोहळ्याला विरोध दर्शवल्यामुळे आता विरोधकांच्या विरोधकांमुळे रद्द होणे शक्य नाही. अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा निमित्ताने निर्विघ्नपणे पार पडावा याच शुभकामना…!

Leave A Reply

Your email address will not be published.