पारोळा : म्हसवे  शिवारात अवैधरित्या गॅस भरताना गॅस सिलिंडरचा स्फोट

0

पारोळा :-पारोळा शहरालगतच म्हसवे  शिवारातल राजस्थानी हॉटेलच्या मागील भागात अवैधरित्या गाड्यांमध्ये गॅस भरताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना रात्री उशिरा घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याने पुढील अनर्थ टळला याबाबत अधिक माहिती अशी की म्हसवे शिवारातील राजस्थानी हॉटेलच्या मागे ओमनीमध्ये अवैधरित्या चोरट्या पध्दतीने गॅस भरला जात असताना १९ रोजीच्या रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ओमनी गाडीमध्ये गॅस भरताना गॅस टाकीने अचानक पेट घेतल्याने तिथे धावपळ उडाली दरम्यान घटनास्थळी दोन गाड्यांमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट झाल्याने सर्वांचीच धावपळ उडाली या दोन्ही गाड्यांचे पुर्ण नुकसान झाले गाड्यांमध्ये गॅस भरणारे नेमके कोण याचा तपास पारोळा पोलिस करीत आहेत

सुदैवाने जीवित हानी टळली
घटनास्थळी जवळपास दहा ते बारा गॅस सिलिंडर पडल्याचे दिसून आले गॅस गाडीत भरताना २ ते ३ गॅस सिलिंडरचा स्फोट झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही, अशी माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पारोळा तहसीलदार डॉ उल्हासराव देवरे, पोलिस उपनिरीक्षक अमरसिंह वसावे शहर तलाठी निशिकांत माने यांच्या सह अनेक पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तर घटनेची माहिती मिळताच पारोळा, एरंडोल येथील अग्निशनमन बंबाना घटनास्थळी पाचारण करण्यात आले या अग्निशमन दलाच्या साह्याने आगिवर नियंत्रण मिळवता आले

तसेच घटनास्थळी रुग्णवाहिका देखील सज्ज झाल्या होत्या. या घटनेचा तपास पारोळा पोलिस करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे आजुबाजुला तसेच म्हसवे शिवारात भितीचे वातावरण पसरले आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेण्याचे काम सुरुच होते.

 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक एम राजकुमार आपत्कालीन प्रतिसादाचे निर्देश देत आहेत. जिल्ह्याचे  पालकमंत्री  गुलाबराव पाटील, महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील आणि मंत्री गिरीश महाजन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. माननीय विधानसभा सदस्य चिमण आबा पाटील घटनास्थळी पोहोचले आहेत.विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मार्गदर्शन केले

अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने  धुळ्याचे जिल्हाधिकारी  अभिनव गोयल यांनी पाठविले .

 

Leave A Reply

Your email address will not be published.