जळगाव ;- दैनिक लोकशाहीच्या लोकारोग्य दिवाळी विशेषांकाचे आज २४ रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्याहस्ते दिमाखात प्रकाशन करण्यात आले.. दैनिक लोकशाहीने गेल्या चार पाच वर्षांपासून आरोग्य या विषयाला दिवाळी विशेषांक समर्पित केला असून या अंकाची वाचक प्रतीक्षा करीत असताना हा अंक आता सर्वत्र उपलब्ध करण्यात आला आहे. .
याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद ,खासदार उन्मेष पाटील,आमदार किशोर पाटील, महापौर जयश्री महाजन , दैनिक लोकशाहीचे कार्यकारी संचालक राजेश यावलकर,हभप ज्ञानेश्वर जळकेकर महाराज,,वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे , पाचोरा भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे , डॉ. अमित भंगाळे, दैनिक लोकशाहीचे महाव्यवस्थापक सुभाष गोळेसर ,ज्येष्ठ पत्रकार प्रमोद बऱ्हाटे ,जाहिरात व्यवस्थापिका पल्लवी सोनवणे,वितरण व्यवस्थापक विवेक कुलकर्णी , आदी मान्यवर उपस्थित होते.
या दिवाळी अंकात आरोग्याविषयी महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या ज्या काही योजना असतील त्याची संपूर्ण माहिती यात देण्यात आली आहे. याचा निश्चित फायदा वाचकांना होणार आहे . तसेच या दिवाळी अंकामध्ये चारोळी,कथा,प्रेरणादायी लेख,कविता,नाट्यछटा ,व्यंगचित्र ,अशाविविध सदरानी परिपूर्ण अशा या दिवाळी अंकाची वैशिष्टये आहेत . सुरुवातीला दैनिक लोकशाहीचे महाव्यवस्थापक सुभाष गोळेसर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक राजेश यावलकर यांनी केले. प्रास्ताविकातून लोकारोग्य दिवाळी विशेषांकाचे महत्व विशद केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दैनिक लोकशाहीच्या लोकारोग्य दिवाळी विशेषांकाचे कौतुक केले. ललित कोळी,मोहन पाटील, राहुल पवार , ,आकाश बाविस्कर,,जागृती भावसार ,,अमोल पाटील ,इतबार तडवी,यश गवळी ,भूषण परदेशी ,आदींनी परिश्रम घेतले.