मुख्यमंत्र्यांच्या तब्बेतीत बिघाड, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी दोघे बरोबरच कार्यक्रमाला येणार होते. काल दुपारपासून त्यांची तब्बेत ठीक नाहीये. थोडा ताप आहे. त्यामुळे डॉक्टरानीं त्यांना आराम करण्यास सांगितले आहे. अशी माहिती साऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देशी यांनी कराड येथे दिली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज कराडलाच येणार होते. परुंतु अचानक त्यांचा दौरा रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला पाय फुटले आहे.

देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज (शनिवार) कराड येथील प्रीतिसंगम येथे राज्यातील अनेक नेते, कार्यकर्ते तसेच नागरिक यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेत आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नसल्याने ते कराड येथे येऊ शकले नाहीत. असे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी स्पष्ट केले. ते म्हणाले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे महाराष्ट्र राज्य देशातील प्रगतशील राज्य बनवण्याचे स्वप्न आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुखमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार पूर्ण करण्याचे प्रयत्न करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.